कोल्हापूर: हर घर तिंरगा अंतर्गत महापालिकेच्या वतीने घेण्यात येणारे विविध उपक्रम खालील प्रमाणे आहेत.
दि. ०८ ऑगस्ट २०२२
सर्व वॉर्ड ऑफिस शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि. ९ ऑगस्ट २०२२
एनयुएलएम, महिला व बालकल्याण विभाग,
७०० बचत गटांच्या बैठका आणि २५ वार्षिक सर्वसाधारण सभांच्या माध्यमातून प्रत्येक नागरीकाने घरासमोर सडा रांगोळी करावी, घराला तोरण लावणे संदर्भात आवाहन करणेत आले आहे,
सामान्य प्रशासन विभाग, प्रशासन अधिकारी व जनसंपर्क विभाग
कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत महापालिकेच्या आवारामध्ये सकाळी ११.०० वाजता एकाच वेळी समूह राष्ट्रगान घेणेत येणार आहे.
कोमनपा जनसंपर्क विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दि.अ.यो. राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान,
शहरातील ४५ स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या घरी भेट देवून कोमनपाचे अधिकारी आपल्या घरी कृतज्ञता भेट देवून त्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करणार आहेत.
१- परीसरामध्ये प्रभात फेरी काढणेत येणार आहे.
२- हुतात्मा दिनाचे औचित्याने हुतात्मा स्मारक येथे ध्वजवंदन करणेत येणार आहे.
३- हुतात्मा स्मारक येथे पर्यावरण पूरक सार्वजनिक उत्सव या विषयावर पर्यावरणतज्ञ श्री. उदय गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
आरोग्य स्वच्छता विभाग
सार्वजनिक स्वच्छता मोहिम
दि. १० ऑगस्ट २०२२
सर्व विभाग –कोमनपाचे सर्व कार्यालयांची संबंधित स्टाफकडून स्वच्छता करणेत येणार आहे.
शालेय विदयार्थी, तरूण मंडळे, महिला मंडळे तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी/कर्मचारी
कोमनपाचे सर्व विभागांमार्फत शहरातील सार्वजनिक ठिकाणे, वारसा स्थळे व महत्वाच्या वास्तू याठिकाणी स्वच्छता मोहिम राबविणेत येणार आहे.
केएमसी कॉलेज -निबंध स्पर्धा – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
राजमाता जिजामाता हायस्कूल-चित्रकला स्पर्धा
प्रशासन अधिकारी-माझी वसुंधरा अंतर्गत शाळा परीसरामध्ये एक झाड लावणे, सिंगल युज प्लास्टीक मुक्त परीसर बाबत कार्यवाही करणे, थुंकीमुक्त परीसर बाबत जनजागृती व अशा आशयाचे फोटो शालेय परीसरात लावणे.
विभा. कार्या. क्र.०३
हुतात्मा स्मारक येथे वन्यजीव व नैसर्गिक साधन संपत्ती जतन व संवर्धन बाबतीत निसर्गमित्र श्री. अनिल चौगुले व श्री. पराग केसरकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान.
दि.११ ऑगस्ट २०२२
केएमसी कॉलेज – वक्तृत्व स्पर्धा –
विषय -१ स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्तता व आव्हाने
२ – भारत स्वातंत्र्याचा इतिहास
विभा. कार्या. क्र. ०३
हुतात्मा स्मारक येथे भारतीय स्वातंत्र्य लढयातील महिलांचे योगदानबाबत डॉ. भारती पाटील, शिवाजी विदयापिठ यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
दि. १२ ऑगस्ट २०२२
आरोग्य विभाग, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व संगणक विभाग
कोल्हापूर शहरातील नागरीक, महापालिका कर्मचारी व शालेय विदयार्थ्यांसाठी मोबाईल वापराचे दुष्परीणाम व मुलांच्या अभ्यासावर होणारे परीणाम याविषयी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून – मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.
केएमसी कॉलेज – राष्ट्रभक्तीपर गीतगायन कार्यक्रम
प्रशासन अधिकारी – केशवराव भोसले नाटयगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम
राजमाता जिजामाता हायस्कूल -निबंध स्पर्धा –
विषय- १- स्वातंत्र्याची ७५ वर्षे (इ.९ वी व १० वी साठी)
२. भारत देश महान (इ. ८ वी साठी)
विभा. कार्या. क्र. ०३
हुतात्मा स्मारक येथे महिलांचे व जेष्ठांचे कायदेशीर अधिकारबाबत प्रा. मेघा ठोंबरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
दि. १३ ऑगस्ट २०२२
केएमसी कॉलेज १- पर्यावरण संवर्धन शपथ
२ वृक्षारोपण
राजमाता जिजामाता हायस्कूल-वक्तृत्व स्पर्धा –
विषय- १ -स्वातंत्र्याची ७५ वर्षे
२ भारत देश महान
३-माझा आवडता क्रांतिकारक
महिला व बालकल्याण विभाग –कोविडमुळे १ व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शालेय साहीत्य व स्कूल बॅग देण्यात येणार आहेत.
विभा. कार्या. क्र. ०३
हुतात्मा स्मारक येथे मोबाईलचे दुष्परीणाम, ऑनलाइन फसवणूक तसेच आर्थिक फसवणूकबाबत श्री. ईश्वर ओंबासे, पोलिस निरीक्षक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
दि. १४ ऑगस्ट २०२२
पर्यावरण विभाग, उदयान विभाग
पर्यावरण संवर्धन शपथ आणि ७५० वृक्षारोपण टेंबलाई टेकडी येथे करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, वृक्ष लागवड करावी आणि प्लास्टीक बंदी करावी यासाठी शपथ घेणेत येणार आहे.
विभा. कार्या. क्र. ०३
१- पर्यावरण संवर्धन शपथ कार्यक्रम
२- परिसरातील शाळांमध्ये वृक्षारोपण
३- हुतात्मा स्मारक येथे निरोगी आरोग्य व आनंदी आयुष्यबाबत डॉ. संदीप पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
दि. १५ ऑगस्ट २०२२
मनपा सर्व विभाग
ध्वजारोहन कार्यक्रम
प्राथमिक शिक्षण समिती व विभा. कार्या. क्र. ०३
१- शहर परीसरातील मनपाच्या सर्व शाळांनी आपल्या परीसरात प्रभात फेरी काढणेत येणार आहे.
२-शालेय स्तरावर प्रश्न मंजुषा