विविध जनरेशनला एकत्र आणणारा नाईकनवरे डेव्हलपर्स साकारत आहेत देशातील पहिला कम्युनिटी “”कुटुंब”” प्रकल्प….!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 24 Second

विशेष वृत्त अजय शिंगे

पुणे : आधुनिक काळात प्रत्येक व्यक्तिला वाटते की आपण देखिल एकत्र कुटुंबाचा आनंद घ्यावा एकत्र राहावं, जसं पूर्वी लोक राहायचं एकत्र. सगळ्या सुख सोई सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असाव्यात, सध्याच्या आधुनिक विचारांसह जी आधीच्या काळापासून ज्या पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती भारतामध्ये आहेत.त्यांना पुनः उभारी मिळावी या दृष्टिकोनतून ‘नाईकनवरे डेव्हलपर्स’ साकारत आहेत देशातील पहिला थीम आधारित प्रकल्प “कुटुंब” देशातील कम्युनिटी लाईफस्टाईल वर लक्ष केंद्रित करणार कंपनी प्राइमस. या कंपनी तर्फे वेगवेगळ्या जनरेशन साठी कम्युनिटी प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे.नाईकनवरे डेव्हलपर्स’ आणि प्राइमस दोघांनी मिळून एकत्र कुटुंब पद्धत पुन्हा एकदा रुजू व्हावी यासाठी सुरू केलेला हा सुंदर प्रकल्प आहे.

 पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाईकनवरे डेव्हलपर्सचे संचालक हेमंत नाईकनवरे म्हणाले की आजच्या काळात विविध प्रकारच्या जनरेशनला एकत्र करून त्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा करून एक समग्र जीवनशैली सुरू करण्यासाठी आम्ही हा प्रवास सुरू केला आहे. देशातली अशी पहिलीच थीम आहे आणि कुटूंब लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे एक समृद्ध जीवनशैली असलेला आपण एक समुदाय निर्माण करू हाच आमचा कुटूंब लाँच करण्या मागचा मूळ उद्देश आहे.

 

नाईकनवरे डेव्हलपर्स बद्दल माहिती देताना डेव्हलपर्स बिझनेस हेड आनंद नाईकनवरे म्हणाले की नाईकनवरे डेव्हलपर्सची स्थापना १९८६ साली दादासाहेब नाईकनवरे यांनी पुणे येथे केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले आणि सून देखील होती. आजपर्यंत नाईकनवरे डेव्हलपर्सने पाच शहरात ५० प्रकल्प पुर्ण केले आहेत. व्यवसायिक प्रकल्प करण्याव्यतिरिक्त दादासाहेब यांनी, विकास शाळा, हॉटेल्स आणि व्यवसायिक केंद्रे देखिल तयार केली आहेत. कुटूंब प्रकल्प योजना सुरू करून नाईकनवरे परिवाराने समाजामध्ये कल्याणाची भावना वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत..

  या कार्यक्रमासाठी अभिनेते डॉ.मोहन आगाशे, प्राइमसचे व्यवस्थापकीय संचालक आदर्श नरहरी, युथ आयकॉन अमृता रुईकर,सुनील रोहोकले,आनंद नाईकनवरे, हेमंत नाईकनवरे, गौरी नाईकनवरे आणि मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *