कोल्हापूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना : भव्य रोजगार मेळावा

कोल्हापूर :  महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०६/०३/२०२० रोजी सकाळी १० ते २ या वेळेत दि न्यू कॉलेज, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये बॅक ऑफिस, सेल्स ऑफिसर, इंजिनिअर, डाटा एन्ट्री, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, CNC/VMC ऑपरेटर, युनिट मॅनेजरटीम लीडर, सर्व्हिस अॅडवायझर, प्रोडक्शन सुपरवायझर, डेव्हलपमेंट सुपरवायझरक्वालिटी कंट्रोल ऑफिसरड्रायव्हरऑफिस बॉय आदी प्रकारच्या खासगी अस्थापना मधील ३२३ पदांसाठी हा मेळावा होत असून, या मध्ये १४ खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील युवक युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करणे व त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने या मेळाव्यामध्ये बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण व नोकरी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दहावी, आयटीआय, संगणक, व्यवस्थापन, वाणिज्य आदी शाखाचे पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर यांच्यासाठी रिक्त जागा असून याचा जास्तीत जास्त लाभ इच्छुक उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त निखिल मोरे यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *