स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली कुपवाड मध्ये युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य व लायन्स नेत्र रुग्णालय संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 1 Second

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत लायन्स नेत्र रुग्णालय सांगली व युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहना नुसार अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, 

जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनी व त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक यांनी सेकडो लोकांनी शिबिराचा लाभ घेतला या नेत्र तपासणीची खास वैशिष्ट्ये तज्ञ डॉक्टर्स मार्फत रुग्णांची नेत्र तपासणी मोफत करण्या आली होती, तसेच मोतीबिंदू साठी नेत्रभिंगारोपण व अत्याधुनिक फेको मशीनद्वारे उत्तम नेत्रशस्त्रक्रिया, काचबिंदू ,लासरु, तिरळेपणा, डोळ्याची प्लॅस्टिक सर्जरी इतक्यादिवर उपचार लेन्सच्या मागे आलेला पापुद्रा लेसरद्वारे अल्पदरात काढण्याची सुविधा होती.

कुपवाड एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी शिबिराला भेट दिली व मार्गदर्शन केले.दर्गा सरपंच बशीर मुजावर यांनी शिबिराला भेट देऊन युवा पत्रकार संघाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. असे बोलून शुभेच्छा दिल्या

शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्मती गौंडाजे सर यांनी मार्गदर्शन करताना युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सांगली व संघातील पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी एक रुग्णांना दृष्टी देण्याचा उपक्रम राबवून हा संघ चांगलं काम करत आहे. पुढे ही असेच सामाजिक उपक्रम राबवावेत असे बोलून शुभेच्छा दिले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मती गौंडाजे सर तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक कार्यकर्ते महावीर खोत, कुपवाड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष संजय तोडकर, कालिदास डवरी सर प्रविण मिरजकर सांगली जिल्हा अध्यक्ष, तुकाराम कदम सांगली जिल्हा संपर्कप्रमुख, अभिजीत निर्मळे मिरज तालुका अध्यक्ष, मिनाज तांबोळी महिला जिल्हा अध्यक्ष , मिरज तालुका उपाध्यक्ष कौतुक नागरेकर, शहराध्यक्ष संग्राम मोरे, निलेश मगर, ज्येष्ठ पत्रकार इरफान बारगीर, सुवार्ता तिवडे,पुनम रजपूत,संजय वळवडे,शरद गाडे,संजय पाटील, अरविंद माने,राजू कदम समाजसेवक उदय बेलवरकर, दैनिक बंधूंचा चे पत्रकार सुभाष पाटील, दैनिक महासत्ता चे प्रमोद अथणीकर, दैनिक केसरी चे मच्छिंद्र कांबळे, मेगा न्यूज चे संपादक समाधान धोतरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुपवाड शहर अध्यक्ष प्रमोद गौंडाजे, मल्लेश चव्हाण, व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *