श्री शाहू छत्रपती मिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.३ : राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वात जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन शाहू मिल येथील स्वच्छता मोहिमेच्या […]

थेट पाइपलाइनचे पाणी पिण्यासाठी, ना की अंघोळीसाठी : भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफांना टोला..!

‎कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.३ : कोल्हापूर मधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही; असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. कोल्हापूर उत्तर […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त..

मुंबई/प्रतिनिधी,दि. १ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस […]

किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

‍करनूर/प्रतिनिधि दि. १:कि‎रीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण […]

रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा: नेताजी बुवा ,जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

हमिदवाडा प्रतिनिधी, दि १ : कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे याबाबत ठोस उपाय योजना करून हा रासायनिक खतांचा तुटवडा पूर्ववत करावा या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कार्यालय कागल या […]

निवडणूक आयोगाने मतदानासाठी ठरवून दिलेल्या  १२ पैकी १ पुरावा ग्राह्य धरणार : निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर….!

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. १ : जिल्हयातील २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचे मतदान दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानासाठी ठरवून दिलेल्या  […]

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे

मुंबई प्रतिनिधी : अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

शिंगणापूर पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने १ एप्रिलपासून एक दिवस आड पाणी पुरवठा..!

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिंगणापूर योजनेवरील पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने या योजनेवरील चार पंपांचा पाणी उपसा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे ए/बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील दैनंदिन पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने […]

गोमटेश विद्यापीठ बेळगाव आयोजीत जिल्हास्तरीय ‘आयक्यु टेस्ट’ उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद…!

निपाणी/प्रतिनिधी: विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीबरोबरच व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी  या उद्देशाने गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने आयोजित ‘आयक्यु टेस्ट’ उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. निपाणीतील ‘गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुल’ येथे या जिल्हास्तरीय उपक्रमाचे (दि.२७ ) आयोजन करण्यात आले होते.  तीन ते बारा या वयोगटातील मुले यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘गोमटेश’चे उदय पाटील उपस्थित होते. गुढीपाडवा (दि २) यादिवशी प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रम देण्यात येणार असून पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपक्रमात प्रसिद्ध निवेदिका ,व्याख्यात्या महेश्वरी गोखले यांनी ‘बालसंस्कार व संगोपन’ या विषयावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.  गोखले म्हणाल्या, आपलं घर ही एक प्रयोगशाळा आहे.  घराच्या बाल्कनीमध्ये दोन छोट्या कुंड्या ठेवून तुम्ही निसर्गाशी जवळीक साधण्याचा संदेश मुलांना देऊ शकता. जगाचा नकाशा हॉलमध्ये भिंतीवर लावून आपण मुलांना देश ओळखण्याचा घरच्या घरी अभ्यास देऊ शकता, त्यामुळे भूगोल विषयाचा पाया भक्कम होऊ शकतो. मुलांवर संस्कार करण्याची माता व पिता या दोघांचीही समान जबाबदारी आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये स्पर्धात्मक युगात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी मुलांना शिक्षकघडवत असतात. शाळेव्यतिरिक्त वेळचा सदुपयोग करून कला-क्रीडा यामध्ये मुलांनी प्राविण्य प्राप्त करून वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे असेही गोखले यांनी नमूद केले. ‘गोमटेश’ स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमानिमित्त विज्ञान विषयावरील रांगोळी, विविध प्रकारची चित्रे, माझी शाळा या विषयावरील निबंधांचे प्रदर्शन केले.  उपक्रमास मुख्याध्यापिका ज्योती हरदी , दीपाली जोशी, नंदिनी पाटील, शोभा इंगळे, शाहिस्ता सय्यद ,महानंदा बक्कनावर, प्राची […]

यंदा वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेवून प्रशासनाने यात्रा नियोजन करावे : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२८ : गेली २ वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यंदाच्या वर्षी या प्रादुर्भावात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे प्रती वर्षाच्या तुलनेत यंदा अधिकचे ३० टक्के भाविक जोतिबा यात्रेसाठी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात […]