Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 13 Second
मुंबई/प्रतिनिधी,दि. १ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम असेल.