आदमापूरच्या बाळूमामा देवालयासह जिल्हयातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी रु . ८ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर : खासदार संजय मंडलिक

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 51 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि १ : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२१-२२ या वर्षाकरीता आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान सह कागल तालुक्यातील निढोरी , कुरणी , सुरुपली या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ८ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यानी दिली . या विकास निधीमुळे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आदमापूर , ता . भुदरगड येथील बाळूमामा देवस्थानसह कागल तालुक्यातील निढोरी , कुरणी व सुरूपली येथील महादेव मंदिर परिसराचा विकास व सुशोभिकरणासाठी चालना मिळणार आहे . योगायोगाने सदरची सर्व पर्यटन स्थळे निपाणी फोंडा या राज्य मार्गावर येत असून महाराष्ट्रासह कर्नाटक , कोकण , गोवा या भागातील भक्तांगणासह पर्यटकांची चांगली सोय होणार असून अनेकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत . संबंधित गावच्या ग्रामपंचायतीसह देवस्थान ट्रस्टनी ठरावाद्वारे माझ्याकडे मागणी केलेनुसार सदर पर्यटन स्थळांच्या विकासाकरीता खास बाब म्हणून निधी मिळणेसाठी मी मा.नाम . मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे व समक्ष भेटून पाठपुरावा केलेने निधी मंजूर झाला . मंजूर कामामध्ये आदमापूर , ता . भुदरगड येथील बाळूमामा देवालय संरक्षण भिंत , काँक्रिट रोड , बाळूमामा महानिर्वाण स्थळ व मरगाई देवालय दर्शन मंडप अदी कामासाठी ३ कोटी ७७ लक्ष व कागल तालुक्यातील निढोरी येथील महादेव मंदिर

परिसर विकासासाठी ३० लक्ष , कुरणी येथील महादेव मंदिर परिसरासाठी १ कोटी २५ लक्ष तसेच सुरुपती येथील महादेव मंदिर परिसर विकास व गाव तलाव सुशोभिकरणासाठी ३ कोटी ३० लाख रुपये असा एकूण ८ कोटी ६१ लाख रुपयेच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे . यापैकी रु .२ कोटी ६१ लक्ष रुपयेचा पहिला हप्ता जिल्हाधिकारी , कोल्हापूर यांच्याकडे वितरीत करणेत आला आहे . या कामांची कार्यान्वयीन यंत्रणा कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद , कोल्हापूर ही राहणार असून दोन आर्थिक वर्षात सदरची मंजूर विकास कामे पूर्ण करण्याची कालमर्यादा घालणेत आली आहे . टप्प्याटप्प्याने जिल्हयातील इतर पर्यटन स्थळांसाठीही निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *