भागीरथी महिला संस्थेतर्फे रंगलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे रात्री उशीरा जल्लोषात झाले बक्षिस वितरण, लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी संघाने पटकावले अजिंक्यपद ..

Share Now

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्यावतीने यंदा सलग १५ व्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभुतपूर्व प्रतिसादात पार पडली. रात्री उशीरा या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेत लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २५ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह, तर चव्हाणवाडी पन्हाळा इथल्या जयजिजाऊ महिला गटाने द्वितीय क्रमांक, २० हजार रूपये आणि सन्मानचिन्ह, तर राजगोळी इथल्या शिवकला झिम्मा फुगडी गटाने तृतीय क्रमांक पटकावत १५ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह मिळवले. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.


खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रेरणेतून सौ. अरूंधती महाडिक यांनी १५ वर्षापूर्वी महिला सक्षमीकरणासाठी भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती. १० वर्षाच्या मुलीपासून ते ७५ वषाच्या वृध्देपर्यंत विविध वयोगटातील महिलांनी स्पर्धेत सहभाग घेत, पारंपारिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी स्पर्धास्थळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर तसेच कोल्हापूर कन्या अभिनेत्री हेमल इंगळे यांनी उपस्थिती लावली.

महिलांनी टाळया आणि शिट्टयांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अभिनेते सचिन यांनी महिलांशी संवाद साधला. अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला ३६ वर्ष पूर्ण झाल्याबद्दलच्या आठवणी त्यांनी जागवल्या. या आठवडयात नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरबद्दल आपल्याला विशेष प्रेम आणि आकर्षण असल्याचं सचिन पिळगावकर यांनी सांगितले. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, कोल्हापूर आर्ट अ‍ॅन्ड कल्चरच्या अध्यक्षा सौ. वैष्णवी महाडिक, मंजीरी महाडिक यांनी मान्यवरांचं स्वागत केले. दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या युटयुब चॅनेलच्यावतीनं लकी ड्रॉ कुपन्स काढण्यात आली. त्यामध्ये भाग्यवान ठरलेल्या रेणु उबाळे, सुचेता अतिगे्रे, सरोजनी कारंडे, अनिता पाटील, श्रध्दा पताडे, शोभा वडुलकर, मंगल बनसोडे, कविता वास्कर, स्नेहा पाटील यांच्यासह विजेत्या महिलांना मंगलताई महाडिक, शकुंतला महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, क्रीना महाडिक, ग्रिष्मा महाडिक यांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरवण्यात आले. दरम्यान कागलच्या चार महिलांनी अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कणेरीवाडीच्या तरूणीने सादर केलेल्या कवितेचे उपस्थितातून कौतुक झाले. प्राची पाटील यांनीही उत्तम सादरीकरण केले. तोडकर संजीवनी नैसर्गीक आयुर्वेदिक उपचार आणि केरळीय पंचकर्म सेंटर हे मुख्य प्रायोजक, तर जिजाई मसाले हे या कार्यक्रमाला सहप्रायोजक म्हणून लाभले. स्वागत तोडकर आणि जिजाई मसालेच्या वैशाली भोसले यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान या स्पर्धेत लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २५ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह तसेच दुसर्‍या क्रमांकासाठी चव्हाणवाडी पन्हाळा इथल्या जयजिजाऊ महिला गटाला २० हजार रूपये आणि सन्मानचिन्ह, तर राजगोळी इथल्या शिवकला झिम्मा फुगडी गटाने तृतीय क्रमांक पटकावत १५ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देवून ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते गौरवण्यात आले. चंदगडच्या कंग्राळी इथल्या स्फुर्ती झिम्मा फुगडी गटाला चौथा क्रमांक आणि बुधवार पेठेतील ताराराणी झिम्मा फुगडी गटाला पाचवा क्रमांक, तर राधानगरीतील सावर्डे इथल्या शंकर पार्वती झिम्मा फुगडी गटाला सहावा क्रमांक मिळाला. या विजेत्यांना पाच हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. चंदगडच्या कंग्राळी इथल्या स्फुर्ती झिम्मा फुगडी गटाला चौथा क्रमांक आणि बुधवार पेठेतील ताराराणी झिम्मा फुगडी गटाला पाचवा क्रमांक, तर राधानगरीतील सावर्डे इथल्या शंकर पार्वती झिम्मा फुगडी गटाला सहावा क्रमांक मिळाला. या विजेत्यांना पाच हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. युवती फुगडी गटात दर्‍याच्या वडगावच्या नम्रता बल्लाळ, अनुष्का बल्लाळ यांचा प्रथम तसेच गायत्री पाटील, दिपाली पाटील यांचा द्वितीय, खंडोबा तालमीच्या आराध्या कवडे, योगिता गुरव यांना तृतीय क्रमांक मिळाला. इशाणी पोवार, आरोही पाटमकर यांना चतुर्थ, पन्हाळा तालुक्यातील पासार्डे इथल्या वनिता पाटील, रसिका पाटील यांना पाचवा, तर राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या हर्षदा पोवार, प्रांजली बर्गे यांना सहाव्या क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. युवती फुगडी स्पर्धेत संध्यामठ, पन्हाळा, बालिंगा, गडमुडशिंगी इथल्या महिलांच्या गटांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. पारंपारिक वेशभुषा स्पर्धेत बालिंगाच्या अलका यादव प्रथम, चंदगडच्या तनुजा हेब्बाळकर द्वितीय, तर नाधवडेच्या प्रफुलत्ता बिडकर यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. गंगावेशच्या सोनाली जाधव, तिटवेच्या अनिता पाटील, पाचगावच्या शितल जाधव यांना अनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहाव्या क्रमांकाचे बक्षिस देवून गौरवण्यात आले. या स्पर्धेत २५ महिला स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. घोडा-घोडा स्पर्धेत वडरगेच्या सुप्रिया गायकवाड प्रथम, वसगडेच्या वर्षा पाटील द्वितीय, नंदगावच्या जयश्री चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कसबा बावडयातील शितल भोसले, पन्हाळयातील मेघा भोसले, गोकुळ शिरगावातील सारीका कांबळे यांना अनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक मिळाला. या स्पर्धेत २० महिला स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली. युवती पारंपारिक वेशभुषा स्पर्धेत उचगावच्या परिणीती केकतपुरे प्रथम, कारंडे मळयातील अक्षरा घोडके द्वितीय, असंडोलीतील स्वरूपा सातपुते यांना तृतीय क्रमांक मिळाला. बालिंग्यातील दुर्वा जांभळे यांना चौथा, रविवार पेठेतील सलोनी थोरवत पाचवा, पुंगावच्या सृष्टी चौगले यांनी सहावा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत १० युवतींना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. उखाणा स्पर्धेत मरळीच्या कविता पाटील प्रथम विजेत्या, कोवाडमधील सुवर्णा पाटील द्वितीय, तर उत्तरेश्वर पेठेतील अर्पिता राबाडे तृतीय विजेत्या ठरल्या. कागलमधील वैशाली मगदुम चौथा, गारगोटीतील राधिका कलगुटकी पाचवा, तर विक्रमनगरातील संजीवनी सटाले यांनी सहावा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत २५ महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. छुई फुई स्पर्धेत विक्रमनगरातील अश्विनी गुरव प्रथम, शिरगावातील वर्षा चौगले द्वितीय, तर देसाईवाडीतील अलका खोत तृतीय विजेत्या ठरल्या. कंदलगावातील श्रध्दा हिंदुले, नंदगावातील सुरेखा मगदुम आणि केकतवाडीतील स्नेहल यादव अनुक्रमे चौथा, पाचव्या आणि सहाव्या विजेत्या ठरल्या. युवती झिम्मा स्पर्धेत कसबा सांगावच्या वाकनाक युवती मंच प्रथम, संध्यामठ गल्लीतील श्री करवीर निवासिनी ग्रुप द्वितीय, धुंदवडेतील मोरजाई ग्रुप तृतीय, लोटेवाडीतील जिजामाता ग्रुप चतुर्थ, शिवाजी पेठेतील होम मिनिस्टर ग्रुप पाचवा, तर तामगावातील रणरागिनी ग्रुप सहावा क्रमांकाचा विजेता ठरला. याच युवती झिम्मा गटातील १५ जणांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. सुप नाचवणे स्पर्धेत जोतिबा डोंगरावरील अमृता भोर प्रथम, पन्हाळयातील सिंधुताई पाटील द्वितीय, कागलमधील प्राजक्ता मोहिते तृतीय, वळीवडेतील ॠतुजा कुसाळे चतुर्थ, केकतवाडीतील कविता यादव पाचवा तर मारूळमधील सविता मगदुम सहाव्या क्रमांकानं विजयी झाल्या. युवती काटवट काणा स्पर्धेत संध्या गायकवाड, अक्षरा घोडके, सिध्दी सरनाईक, सुवर्णा पाटील,भक्ती पाटील, वेदीका पाटील विजेत्या ठरल्या. या गटातील ३० जणांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली. महिला काटवट काणा स्पर्धेत रेश्मा यादव, राधिका कुलकर्णी, रेश्मा वडाळे, विद्या माने, जयश्री पाटील, उमा सावंत विजेत्या ठरल्या. या स्पर्धेत ३० महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसं दिली. जात्यावरील ओव्या स्पर्धेत विद्या सावंत, निला कांबळे, छाया शेटे, आनंदी डबडे, आक्काताई चौगले आणि अश्विनी कदम विजेत्या ठरल्या. या स्पर्धेत २९ महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली. घागर घुमवणे स्पर्धेत सुवर्णा पाटील, रेविता जगदाळे, माधुरी पाटील, मंगल चौगले, प्रज्ञा शिंदे, मृणाल गवळी विजयी झाल्या. या स्पर्धेत २५ महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. त्याचबरोबर २५ गटांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. तर १२ ते १८ वयोगटातील युवतींना ५० हजार रूपयांची बक्षिसे आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी रूपाली कोंडुसकर, माजी नगरसेविका भाग्यश्री शेटके, उमा इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी महिला या स्पर्धेचा निकाल चॅनेल बी च्या ५३२ क्रमांकाच्या चॅनेलवर स्ट्रिपद्वारे पाहू शकतात.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *