‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप…

कोल्‍हापूर ता.३१: गेल्‍या काही दिवसांपासून अति पावसामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये महापूर आला असून, काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्‍थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्‍त शुगर्स, टाकळीवाडी ता. शिरोळ […]

सुतारवाडा येथील नाल्यातून 20 टन वाहता कचरा उठाव

कोल्हापूर ता.31: शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज 30 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठाव करण्यात आला आहे. यातील 20 टन वाहता कचरा […]

आय.डी.बी.आय.बँकेकडून कर्मचा-यांसाठी 224 गमबुट

कोल्हापूर ता.31: पूर परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आज महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये आय.डी.बी.आय.बँकेचे कोल्हापूर जनरल मॅनेजर आणि रोजनल हेड विक्रम भिडे यांनी सफाई कर्मचा-यांसाठी 224 गमबुट प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्त केले. […]

सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरीद्वारे आजअखेर 164 मॅनहोल चेंबर साफ

कोल्हापूर ता.31: पूराचे पाणी ओसणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य चेंबर लाईन साफ करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेस ठाणे, नवी मंबई व बृहन्मुंबई महापालिकेकडून सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरी मागविण्यात आली आहेत. यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी […]

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग व 43 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

कोल्हापूर, दि. 30 : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्य मार्ग व 43 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 52 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील […]

टेलीमानस सेवांमध्ये कोल्हापूर राज्यात प्रथम; मानसिक समस्यांवरील मोफत सल्ल्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

कोल्हापूर, दि. 30  : कोल्हापूर जिल्हा टेलिमानस सेवांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य विभागाच्या टेलिमानस विभागाच्या 14416/ 18008914416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मानसिक समस्यांवर मोफत समुपदेशन करुन सल्ला दिला जातो. मानसिक समस्या असलेल्या […]

जिल्ह्यातील 77 बंधारे पाण्याखाली…

कोल्हापूर, दि. 30 : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 38.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.4 मिमी, शिरोळ -2.2 मिमी, पन्हाळा- 23.2 […]

शहरात कालपासून 40 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व प्लॅस्टीक कचरा उठाव

कोल्हापूर ता.29: पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत कालपासून 40 टन […]

पूर ओसरत असलेल्या भागातील स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर ता.29: पंचगंगा नदीचे पूराचे पाणी शहरातील ब-याच भागात आले होते. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. शहरातील ज्या भागात पूराचे पाणी आले होते. ते ओसरु लागल्याने महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर कालपासून […]

पूर ओसणा-या भागामध्ये स्वच्छता व औषध फवारणी करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर ता.28: पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये स्वच्छता व औषध फवारणी करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या. महापालिकेच्या स्थायी समिती समिती सभागृहात सकाळी […]