महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन

कोल्हापूर :- स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.१५ वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औधंकर, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, लेखा अधिकारी सुनिल काटे, मुख्य लेखापरिक्षक मिलिंद कुलकर्णी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबुराव दबडे, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, अंतरगत लेखापरिक्षक प्रशांत पंडत, संजय भोसले, इस्टेट अधिक्षक सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समिर व्याघ्रांबरे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे , सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, विजय वणकुद्रे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण सवर्धणाची हरित शपथ घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *