वारणानगर येथे ऊर्जाकुर सहवीज निर्मिती प्रकल्पास मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांची भेट…

विशेष वृत : प्रकाश कांबळे

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व सावित्री महिला उद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभलक्ष्मी विनय कोरे (वहिनी) यांच्या हस्ते नवचंडी यज्ञाची पूजा करण्यात आली..

Advertisements

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या मालकीचा ऊर्जाकुर सहवीज निर्मिती प्रकल्प सुरु झाला असून त्यानिमित्त आज कारखाना कार्यस्थळावर नवचंडी यज्ञ व शेतकरी सभासदांसाठी सुरुची भोजन आयोजित केले होते.

विशेष करून महाराष्ट्र राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) यांनी नवचंडी यज्ञाचे दर्शन घेऊन सुरूची भोजनाचा आस्वाद घेतला.

तसेच वारणा साखर कारखान्याशी निगडीत प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यां सर्वांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. १५ विविध प्रकारचे पदार्थ असलेल्या या सुरुची भोजनाचा सुमारे २५ हजार सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी आस्वाद घेतला..

यावेळी वारणा बॅकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे (दादा), सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन.एच.पाटील (सर), वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहा निपुणराव कोरे, वारणा बँकेच्या व्यवस्थापकीय अध्यक्ष विश्वेश निपुणराव कोरे, भाजप कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे,  जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम (दादा), जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू).

वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.आर.भगत, वारणा विविध उद्योग समुहातील व्हा. चेअरमन, सर्व आजी माजी संचालक, सर्व पदाधिकारी, शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सभासद, ऊस तोडणी व वाहतूकदार, कंत्राटदार, वारणा विविध उद्योग समुहातील कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *