Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
कोल्हापुर प्रतिनीधी, ग्रामपंचायत नगदेववाडी हद्दीत,पाडळी हद्द जिल्हापरिषद कॉलनी लगत गणेश पार्क समोर मोठ्या प्रमाणात कचरा शेताच्या जागेत संकलित केला आहे.कचरा कुजला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गधी पसरुन आरोग्यास निमंत्रित देत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये काम करण्यास अडथळा होत असून अनेक वेळा नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे.
गणेश पार्क. भोगम पार्क. निसर्ग पार्क. पद्मावती काॅलनी. शिव दत्त काॅलनी. जिल्हापरिषद काॅलनी .मिठारी मळा .दुधगंगा वेदगंगा आपारमेंन्ट .महालक्ष्मी पार्क. बालाजी पार्क .व परिसरातील लोक हैराण झाले असून गावाला कोणी वाली आहे की नाही अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे
Share Now