Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठासमोर झाली. अगदी १० मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्तपूर्ण आदेश देत, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपील सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद करत फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाला तूर्तास पक्षचिन्हाचा निर्णय घेऊ देऊ नका, अशी विनंती केली. कोर्टाने ती विनंती मान्य करत २७ तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षचिन्हावर निर्णय घेऊ नये. २७ तारखेला १० मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घटनापीठ पुढचा निर्णय देईल, असं कोर्टाने म्हटलं.
Share Now