विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : जीवाला जीव देणाऱ्या यारी दोस्तीची कथा सांगणारा विहान सुर्यवंशी दिग्दर्शित रूप नगर के चिते हा मराठी चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.अशी माहिती चित्रपटाच्या कलाकारांनी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकलाय का? याच टॅगलाईनवर आधारलेल्या या चित्रपटाची निर्मिती मनन शाह यांनी केलीय. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. या चित्रपटात करण परब आणि कुणाल शुक्ल हे युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार असून यांच्यासह कोल्हापूरची अभिनेत्री हेमल इंगळे ,मुग्धा चाफेकर,आयुषी भावे,सना प्रभू तन्वीका परळीकर ओंकार भोजने,रजत कपूर हे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत.मैत्रीचे धागे जाणीवपूर्वक जपणे कसे महत्वाचे आहे हे सांगू पाहणारा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना पसंतीस पडेल अशी आशा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांच्यासह कलाकारांनी व्यक्त केली.