गंगावेश ते पंचगंगा विसर्जन मार्ग सुरू करावा यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे आंदोलन…!

कोल्हापूर : यंदाच्या गणेश विसर्जन मार्गामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा पारंपारिक मार्ग बंद केला आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरातील संयुक्त उत्तरेश्वर पेठ संयुक्त जुना बुधवार शुक्रवार पेठ गंगावेश परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने गंगावेश चौकामध्ये आंदोलन करण्यात आले.जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन न करण्याचा आदेश जारी करण्यात आला त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पारंपारिक मिरवणूक मार्ग जाहीर करत इराणी खण इथं गणेश विसर्जन करण्याचं नियोजन केले आहे. यामध्ये पारंपरिक महाद्वार रोड वरून गंगावेश मार्गे गणपती इराणी खणीकडे नेण्यात येतील मात्र गंगावेश ते पंचगंगा नदी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

संयुक्त उत्तरेश्वर पेठ बुधवार पेठ शुक्रवार पेठ आणि गंगावेश परिसरातील मंडळांनी आम्ही प्रशासनाच्या विरोधात किंवा प्रदूषण मंडळाच्या विरोधात नाही पण जो गेली कित्येक वर्षे पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग चालत आलेला आहे या मार्गावर हातावर पोट असणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह चालतो त्याचबरोबर सर्वांना सोयीचं विसर्जन मिरवणूक मार्ग असल्याने प्रशासनाने हा मार्ग सुरू करून पंचगंगा नदीवर मूर्ती दान करून घ्याव्यात या मागणी साठी तीव्र आंदोलन केली. पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढत याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते बाजूला झाले यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराटे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन मनेर सतीश घरपणकर श्रीधर गाडगीळ रियाज बागवान माजी नगरसेवक उदय जगताप यांच्यासह परिसरातील मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *