Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
कोल्हापूर : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यंदाच्या गणेशत्सवाला वेगळेच वातावरण तयार झाले आहे,याची एक झलक अपल्याला गणेश आगमन मिरवणुकी मध्ये पाहायला मिळाली होती. आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकी साठी सर्व पेठा,तालीमी, मंडळे, यांच्या मध्ये जोरदार तयारी सुरू झाली असून मध्यरात्रीपासूनच मिरजकर तीकटी येथे मंडळाचे स्ट्रक्चर उभे केले जात आहेत,लाईट शो, साऊंड सिस्टीम जोडायला सुरूवात होत आहे. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ,राजारामपुरी,पाचगाव, यांच्यासह अनेक तरूण मंडळे आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकी साठी सज्ज आहेत. मध्यरात्रीची हि तयारी पाहता आजची मिरवणुक कोल्हापूरकरांसाठी खूपच आकर्षक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Share Now