प्रीत अधुरी २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : जवळपास गेल्या १५ वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दर्जेदार चित्रपट पाहिले. या काळामध्ये दर्दी चित्रपट रसिकांची आवड अशी बदलत गेली, तशीच ती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांकडून विषयाची निवडदेखील बदलत गेली. परिणामी प्रेमकथांसोबतच सामाजिक, राजकीय, कौटुंबिक विषयांना हात घालणारे अनेक दर्जेदार सिनेमे मराठी रसिकांना पाहायला मिळाले. या सगळ्या विषयांसोबतच काही हटके विषयदेखील चित्रपट रसिकांचं लक्ष आकर्षित करणारे ठरतात. अशीच एक हटके कथा घेऊन नवीन चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे प्रीत अपुरी

Advertisements

खरंतर चित्रपटाच्या नावावरून असं वाटू शकतं की हा एखादया प्रेमकथेवर आधारित चित्रपट आहे. त्यात तसं काही यावदेखील नाही. पण कर्यतील नायक आणि नायिकेच्या प्रेमकयेसोबतच या चित्रपटात उलगडत जाणार आहे एक सस्पेन्सा हा सस्पेन्स कुठल्या क्राईम स्टोरीचा नसला तरी त्याच अधिरतेनं प्रेक्षकांना थिएटर्समध्ये खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं कथानक आणि ‘ती’ वस्तू

या चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं. जो व्यक्तीच्या तीन इच्छा पूर्ण करू शकती नायकाचे काका सुपरनॅच्युरल कथांचे लेखक असून चक्क भुताशी संवाद साधणंही त्यांना जमतं आणि त्यांच्याच मार्फत नायकच्या घरी तो वस्तु येते आणि खूप काही अनपेक्षित घडत. पण नायक आणि नायिकेला जेव्हा समजतं की ही वस्तू तीन इच्छा पूर्ण करू शकते, तेव्हा त्यांच्यासाठी आकाश ठंगणं होतं. पण या वस्तूसोबतच अघटित घटनाची शक्यताही येते. त्यामुळे जी काही इच्छा मागायची आहे, ती विचारपूर्वक माग, असा सल्ला नायकाला त्याच्या काकांकडून मिळती. आता नायक आणि नायिका या वस्तूचा वापर करून नेमके काय मागतात आणि त्यातून पुढे कमी पडतात याचा होणारा उलगडा म्हणजे प्रीत अधुरी

कुलस्वामिनी प्रोडक्सनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती स्वप्नाली पवार यांनी केली आहे. दिग्दर्शन प्रियांका यांनी केलं आहे. प्रवीण यशवंत आणि प्रीय दुबे या नव्या जोडीची भन्नाट कैमिस्ट्री चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, समा निनावे आणि कमलेश सावंत यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिव ओंकार, प्रकाशमणी तिवारी, संदीप मिश्रा आणि महादेव साळोखे यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. शिव ओंकार आणि शशिकांत पवार यांनी लिहिलेल्या गीतांना कुणाल गांजावाला, जावेद अली, साधना सरगम, शाहीद माल्या, रितू पाठक, खुशबू जैन आणि सुदेश भोसले यांच्या स्वरांचा साज लाभला आहे.

चित्रपटाचं कथानक जितकं इंटरेस्टिंग आहे, तितक्याच चित्रपटाशी संबंधित इतर काही बाबीदेखील या चित्रपटाचं वेगळेपण अधिक ठळक करणाऱ्या आहेत. चित्रपटात नायकाची भूमिका करणारा प्रवीण यशवंत हा एक अव्वल दर्जाचा डबिंग आर्टिस्ट आहे. अंगी मूलतःच असलेल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं अभिनय क्षेत्रात झोकात पदार्पण केलं. आजपर्यंत हिंदी, मराठी, इंग्रजी, भोजपुरी आणि उर्दू अश तब्बल ५ भाषांमध्ये आपल्या आवाजाची जादू लोकांना दाखवणारा प्रवीण आता पहिल्यांदाच मोठ्या पडदयावर त्याच्या अभिनयाचं कसब जगासमोर ठेवणार आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचं दिग्दर्शन हे जिल्हा परिषद शाळेत पेशाने शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केल आहे. प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुई वस्तू दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयांची जोड, वेगळा विषय आणि त्याची अतिशय साजेशी अशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक संपूर्ण अनुभूती देणारा ठरेल, हे मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *