सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे आयुष्यमान पंधरवडा निमित्त मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळाव्यासह विविध स्पर्धा संपन्न…!

मिरज प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी

मिरज : सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळा व धावणे ,चित्रकला,निबंध स्पर्धेचं आयोजन केले होते.यामध्ये शालेय विद्यार्थी व विद्यर्थिनीनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरण उपआयुक्त्त मा. पांडव साहेब,अभियंता मा. अनिल पाटील साहेब,महात्मा ज्योतिराव फुले जनाआरोग्य योजनेचे आरोग्यमित्र व मिरज प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी ,सिनर्जी हॉस्पिटलचे कॅम्प कोओर्डीनेटर गणेश पवार ,शाळेचे मुख्याध्यापक मा.अरुण कदम सर यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements

यावेळी आरोग्यमित्र विशाल सुर्यवंशी यांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान आरोग्य योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक,पालक व हॉस्पिटलचे स्टाफ उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *