कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलचा भोंगा पुन्हा ऐकू येणार; वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील…!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिल पुनर्जीवित करून ती सुरू करण्यात येणार असून मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री शाहू मिल पुन्हा सुरू करून भोंगा सुरू करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहु स्मृती व विचार जतन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन व अटींची पूर्तता करून ही मिल पुनर्जीवित करून भोंगा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. 

यामध्ये भोंगा वाजविण्याकरिता घ्यावा लागणाऱ्या शासकीय परवानग्यांच्या अधिन राहून प्रथम ६ महिन्यांसाठी महामंडळाची हरकत नाही. तसेच मिलच्या आवारात भोंगा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणि संपूर्ण तांत्रिक बांबीची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी सदर समितीची राहील. या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. असेही वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *