जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच पोलीस कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर…

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी

पोलीस कर्मचारी सातत्याने आव्हानात्मक काम करीत असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पालन करून कटाक्षाने काम करत असताना कर्तव्यात कसूर होऊ नये यासाठीही भान ठेवून सेवा बजावत असतात व सर्व सामान्य लोकांना समाधान कारक निर्भयपणे जगता आले पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करतात एखाद्या गुन्ह्यामध्ये आडमठेंगा पुरावा अभावी गुन्ह्याची तपास करून वरिष्ठांच्या आदेशाने पूर्णपणे प्रामाणिक कर्तव्यदक्ष राहून काम करतात अशा पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर जिल्हा पोलीस प्रमुख या नात्याने कटाक्षाने लक्ष ठेवावा लागतो कामाला प्राधान्य देता देता माणुसकीच्या उद्देशाने पोलीस कर्मचाऱ्यावर त्यांच्या दैनंदिन अडचणी आरोग्याची काळजी कामाचे तान याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे त्यांनी नुकताच दिपावलीच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत आनंदाची व समाधानकारक घोषणा केली.

Advertisements

माननीय जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांचे आदेश असे डिसेंबर अखेर सर्वांनी 

१) वीस किरकोळ रजा उपभोगायची आहेत.

२) प्रत्येक पोलीस ठाण्याला स्नेह मेळावा स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करणे त्यासाठी वेल्फेअर मधून प्रत्येकी ३० हजार रुपये चा निधी दिला जाईल.

३) प्रत्येक अंमलदार यांना येणाऱ्या दिवाळीमध्ये साप्ताहिक सुट्टी जोडून कमीत कमी एक दिवस किरकोळ रजा सक्तीने द्यावी.. 

४) येत्या ऑक्टोंबर २० तारखेपर्यंत सर्व अंमलदार यांना तीन-तीन किरकोळ रजा सक्तीने देण्यात याव्यात.

असे आदेश देत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले,

 जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे साहेब यांनी दिलेल्या आदेशाचे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधानकारक चर्चा सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *