मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष…!

MEDIA CONTROL ONLINE 

 काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत.जवळपास २४ वर्षांनंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्याशिवाय,२४ वर्षानंतर गांधी कुटुंबीयाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी असणार आहे.खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. खर्गे यांना ७८९७ मते मिळाली. तर थरूर यांच्या पारड्यात १०७२ मते आली. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *