कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक….!

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान असवैधानिक शब्द उच्चारल्याबद्दल त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. अमादर जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व जयंत पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध नोंदविला. तर आमदार जयंत पाटील यांच केलेले निलंबन त्वरित मागे घ्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर के पवार यांनी दिलाय.

यावेळी सुनील देसाई, आदिल फरास, सुनील पाटील, प्रकाश पाटील, जाहिदा मुजावर,पूजा साळोखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *