कोल्हापूर नगरीत अभाविप चे शक्ती प्रदर्शन…

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन २३,२३व २५ डिसेंबर ला कोल्हापूर मध्ये होत आहे. आज (२४ डिसेंबर) या अधिवेशनाच्या दूसऱ्या दिवशी संपूर्ण कोल्हापूर नगरी समोर अभाविप ने आपले शक्तिप्रदर्शन केले. अभाविप च्या वतीने आज कोल्हापूर मध्ये शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले. यात, पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय रित्या ७ जिल्हे व अभाविप च्या कार्य क्षेत्रानुसार एकूण २३ जिल्हे सहभागी झाले. शोभायात्रेची सुरूवात एस. एम. लोहिया कॉलेज, पेटाळा मैदान येथून झाली. या शोभा यात्रेने पेटाळा मैदान, खरे कॉर्नर, बिनखांबी चौक, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, खासबाग मिरजकर तिकटी या मार्गावरून मार्गक्रमण केले. यावेळी, कोल्हापूरातील नागरिकांनी या शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करून अतिशय उत्साहाने स्वागत केले. शोभायात्रेचा शेवट मिरजकर तिकटी या ठिकाणी झाला.त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. 

मिरजकर तिकटीला जाहीर सभा

 या जाहीर सभेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री कु. अंकिता पवार मुख्यतः उपस्थित राहिल्या. यावेळी, विद्यार्थी परिषदेतील छात्र नेत्यांनी विविध विषयांना घेऊन विद्यार्थ्यांना संबोधित केले. यानंतर, प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे शिक्षण क्षेत्रात केलेल्या संघर्षाची माहिती देत असताना बोलले, “विद्यार्थी परिषदेसाठी संघर्ष काही नवा नाही, अभाविप ही काही काल आज मध्ये स्थापन नाही झाली, अभाविप ला संघर्षाचा इतिहास आहे, त्यामुळे विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता संघर्षाला कधीही घाबरत नाही.” भविष्यात विद्यार्थी परिषदेला शिक्षण क्षेत्रात क्रांती करायची आहे, आणि सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या योगदानाने ती आपण नक्कीच करू, असा विश्वास त्यांनी दाखवला. याचसोबत, स्वतंत्र पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे हे पहिले अधिवेशन आहे. याचे औचित्य साधून आपण निश्चय करायचा आहे की, हक्काचे शिक्षण घेण्यासाठी आपण प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळवून देऊ. आणि जिथे जिथे विद्यार्थी राहिल तिथे तिथे आपला परिषद त्याच्या मदतीला राहिल.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *