कागल मध्ये मुश्रीफ समर्थक आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की….!

विशेष वृत्त अजय शिंगे 

कागल : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकरण संदर्भात ईडीने आणि आयकर विभागाने ही सर्व धाड मारली आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक खूपच आक्रमक झालेले आहेत. आ.मुश्रीफ यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहे.यावेळी पोलीस आणि समर्थक यांच्यात धक्काबुक्की चे प्रकार घडले असून समर्थकांना थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे 

Advertisements

सकाळी ६. ३० वाजता अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहचले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर कागलमधील घरावर ईडीचे छापे पडले. जवळपास २० अधिकारी आज पहाटे ६. ३० वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी पोहचले. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एका बड्या नेत्याच्या घरी आयकर विभाग आणि ईडीने छापेमारी करण्याची ही सर्व पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरी झालेल्या छापेमारीनंतर आता मुश्रीफ यांच्या समर्थकांनी यांच्या घराबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात समर्थक या ठिकाणी जमा झाले आहेत. त्यामुळे सर्व परिसरात मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *