Share Now
Read Time:1 Minute, 5 Second
कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोना बाधित असा अपप्रचार करुन परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची यादी समाज माध्यमावर फॉरवर्ड केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये अध्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले,
जे लोक परदेश प्रवास करुन आले आहेत. अशा लोकांना घरामध्येच अलगीकरण करण्यास सांगितले आहे. काही जणांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अशांनी १४ ते १५ दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. अशांचा अपप्रचार करु नये.
समाज माध्यमांवर अपप्रचार करणे अथवा अफवा पसरवल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल.
Share Now