मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात १४४ कलम लागू : पोलीस निरीक्षक बाबर…

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी दि.२३  : कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत असल्याने केंद्र व राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. या करता कोल्हापूर शहरात १४४ कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी  पोलीस प्रशासन महत्वाची भूमिका बजावत  आहे.

१४४ कलमासंदर्भात अंमलबजावणी विषयी विचारले असता,

Advertisements

बोलताना कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर म्हणाले,कि १४४ कलमाअंतर्गत जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत जर एखादे दुकान सुरु असेल तर त्यांना समज देऊन  बंद करण्यास लावले, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे . तसेच चौका चौकात प्रत्येक वाहनांची कसून चौकशी सुरु आहे. अत्यावशक व जीवनावश्यक वस्तू घेऊन प्रवास करणाऱ्यांना विचारपूस करून सोडले जात आहे. व विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे .बाहेरून येणाऱ्या प्रवाशांबद्दल बोलताना बाबर म्हणाले कि,  त्यांची  चौकशी करून खातरजमा झाल्यावरच सोडण्यात येत आहे तसे शंका उद्भवल्यास बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची सीपीआर रुग्णालयात तपासणी सुरु आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *