मुंबई : “कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेशोत्सव” दरवर्षी प्रचंड धूमधडाक्यात साजरा होत असतो. माघी जयंती मध्ये हा गणेशोत्सव गणपती प्रसिद्ध आहे. यंदाचे बारावे वर्ष आहे. या निमित्त युवा समाजसेवक शेखर शेरे यांच्या संकल्पनेतून इच्छापूर्ती बाप्पाचा दरबार साकाराला आहे. यंदाचे विशेष सामाजिक कार्य म्हणजे जनतेच्या गरजा सोडविण्याकरिता “जनसेवेची भिंत” उभारण्यात आले आहे. या उपक्रमामार्फत गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे युवा समाजसेवक शेखर शेरे यांनी सांगितले आहे. तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, ज्येष्ठ नागरिकांना विशेष आरतीचा मान व श्री इच्छापूर्तीच्या मूर्तीची प्रतिकृती भेट देण्यात येणार आहे, रक्तदान शिबिर, विभागातील महिलांसाठी मोफत आरोग्यम कांस्य थाळी फुट तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाजसेवक शेखर शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात माफक दरात रुग्णवाहिका सुरू करण्याचा मानस आहे.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून इच्छापूर्तीचा दरबार साकारण्यात आलेला आहे तसेच श्री मूर्तिकार रतन आंबेकर यांच्या माध्यमातून इच्छापूर्तीची मनमोहक रुप साकारण्यात आलेले आहे.तरी सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहून श्री च्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती.