कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अपमान कारक वक्तव्याबद्दल आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आवडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. जितेंद्र आव्हाड कोण रे पायतान मारा दोन रे, या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध करत आपल्या स्वार्थासाठी मते मिळवण्यासाठी लांगुन चालक करत असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा लोकांना देशद्रोही जाहीर करून त्यांना भारताबाहेर काढले पाहिजे असे सांगितले.
यावेळी प्र.का सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आरध्ये यांनी आपल्या मनोगत आतून जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
यावेळी डॉ राजवर्धन, रमेश देवेकर,विवेक व्होरा, सुनील पाटील, अमेय भालकर, गौरव सातपुते, गिरीश साळुंखे, विशाल शिराळकर, रोहित कारंडे, वैभव पाटील, प्रसाद पाटोळे, मानसिंग पाटील, प्रकाश घाटगे, धीरज मुळे,प्रशांत माने, बालाजी चौगले यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.