कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या उचगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी ,मुडशिंगी, वसगडे ,चिंचवाड, वळीवडे या गावात विनाकारण दुचाकीवरून फिरणारे व्यक्ती आढळून आलेल्या गांधीनगर पोलिसांनी मंगळवार सकाळपासून दुचाकी गाड्या ताब्यात घेण्याची मोहीम राबवली सुमारे ३० ते ४० गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बाहेर फिरण्यास बंदी आहे परंतु अनेकजण विनाकारण दुचाकी गाडीवरून फिरत असल्यास गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने टोइंग व्हॅनद्वारे गाड्या जप्त करून गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात लावल्या जात आहेत तनवाणी कॉर्नर तावडे हॉटेल परिसर, उचगाव हायवे ब्रिज, गडमुडशिंगी फाटा ,गावातील मुख्य मार्ग याठिकाणी कारवाई केली आहे.
या सर्व गाड्या 15 एप्रिल नंतरच दंड वसूल करून गाडी मालकांच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत अशी माहिती
गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली आहे.