पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने होणार महिलांचा सन्मान…!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 33 Second

कोल्हापूर : पोलिस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही पोलिस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून कार्यरत असलेली संस्था आहे. अगदी कमी कालावधीत या संस्थेची घौडदौड निम्म्या महाराष्ट्रात पोहचली आहे. नैसर्गिक आपत्ती,बंदोबस्त यासाठी जवानांच्या माध्यमातून एक टिम काम करीत आहे.सध्या कोल्हापूर,सांगली,सिंधुदुर्ग, रत्नागिरी,सोलापूर येथे जवानांच्या माध्यमातून टिम कार्यरत आहेत तर सामाजिक बांधिलकी जपत पोलिस आणि नागरिक यांच्या मधला दुवा म्हणून एक टिम कोल्हापूर,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, पुणे,मुंबई,सोलापूर या जिल्ह्यात कार्यरत आहे. यामध्ये महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय आहे.पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने अनेक सामाजिक, शासकीय उपक्रम उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त ज्या महिला अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे पण त्यांची ओळख किंवा दखल कोणत्याही संस्था, संघटनांनी घेतली अशा कर्तृत्ववान महिलांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.यामध्ये १५ पुरस्कार पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असून इतर १५ पुरस्कार शासकीय, निमशासकीय, सामाजिक,राजकीय, औद्योगिक,कला,क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांच्या कार्याची

 माहिती प्रस्ताव सादर करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,फेटा आणि रोप असे असणार आहे.हे प्रस्ताव संस्थापक अध्यक्ष मा युवराज मोरे मो.नं.-९१४६७४६५६५,उपाध्यक्ष नियाज जमादार-९६५७७७८००६ या नंबर वर प्रस्ताव पाठवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार युवराज मोरे यांचा वाढदिवस ही यानिमित्ताने साजरा करण्यात येणार आहे.पुरस्कार प्रदान सोहळा आणि वाढदिवस कार्यक्रम या दोन्ही कार्यक्रमाचा एकत्र सोहळा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दि.११ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वा.शाहू स्मारक भवन,दसरा चौक येथे होणार आहे.यासंदर्भात माहिती पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे, राज्य महिला अध्यक्ष उज्वला चौगले, राज्य महिला सचिव रजनीताई शिंदे, राज्य उपाध्यक्ष पद्मिनी माने,कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली जाधव यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला पोलिस मित्र असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार,राज्य सचिव आमित मोरे, राज्य खजिनदार कॉम्रेड आनंदा कराडे,राज्य सदस्य प्रल्हाद माने,मिलिंद चव्हाण,राज्य महिला संघटक रुपाली ठोमके, राज्य महिला संपर्क प्रमुख सुरेखाताई सातपुते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महेश पोवार, कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष संगिता हुग्गे,अनिकेत गुरव,विजय शिंदे, लवेंद्र शिवथरे,श्रीकांत शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *