कोल्हापूरात ठाकरे गट आणि भाजप आमने सामने…. दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी…..!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 48 Second

विशेष वृत्त अजय शिंगे 

कोल्हापूर : छ.शिवाजी चौक कोल्हापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख कोल्हापूर संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी’ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, युवा सेना अध्यक्ष मंजीत माने, राजू यादव स्मिता सावंत, प्रीती क्षिरसागर,शशी बिडकर,नगरसेवक नियाज खान आदी पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान भाजपाची मी सावरकर गौरव यात्रा ही छ. शिवाजी महाराज चौकात पोहचली. दोन्हीही पक्षच्या वतीने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.   

यावेळी ठाकरे गटाकडून भाजपने आयोजित केलेल्या सावरकर गौरव यात्रेवर टीका केली. सावरकर यात्रा सारखे उपक्रम करण्यापेक्षा सावरकरांना भारतरत्न देणे हा त्यांच्या कार्याचा खरा सन्मान ठरणार आहे.यावेळी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, जय जय भवानी जय शिवाजी,हमसे जो टाकारायेगा मिट्टी मे मिल जायेगा,छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हिंदुराष्ट्र की जय, प्रभू रामचंद्र की जय, ढोंगी यात्रा

 कश्याला अशा घोषणा देण्यात आल्या. प्रत्युत्तर भाजप कडून देखील जोरदार घोषणाबाजी आणि टीका केली गेली 

सावरकरांना श्रद्धांजली देण्यासाठी दोन्ही कडून शांतता पाळली गेली.

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडी म्हणाले ज्यांना सावरकरांचं त्याग आणि कार्य माहित नाही त्यांनी त्याच्या बाबत बोलण्याची इतरांची लायकी नाही त्यांनी बोलणं योग्य नाही. राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा वारंवार अपमान होत आहे. स्वातंत्र्यवीरांचा अपमान होणे योग्य नाही

शिवेसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले एका अभिनेत्रीला पुरस्कार दिला जातो पण सावरकर यांना दिला जात नाही. प्रभू रामचंद्र, छ शिवाजी महाराज्यांच्या नावाची ढाल करून स्वतःची पोळी भाजून घेण्याची काम करत आहे. सावरकर यांची यात्रा केवळ ढोंगचं आहे. भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे.मताच्या राजकारणासाठीच ही नाटकी यात्रा सुरु आहे. तुमचा हा दुटप्पी पणा आहे. बाबरी मशीद पडली तेव्हा हजारोचा बळी गेला त्या ठिकाणचा गौरव करता धर्म धर्म मध्ये तेढ निर्मान करता तुम्ही, देशाचं वाटोळं चालू केलं आहे.यात्रेला माणसं कमी रिक्षाचं जास्त आहेत. हुकूमशाही कडे या सरकारची वाटचाल सुरु आहे. जेव्हा छ. शिवाजी महाराज शाहू महाराज, म. फुले यांचा अपमान झाला तेव्हा कोठे होता तुम्ही होता कुठे 

       दरम्यान पन्नास चे खोके एकदम ओके, हिंदू राष्ट्र कि जय, छ शिवाजी महाराज कि जय, हिंदू धर्म कि जय, हर हर महादेव, आवाज कोणाचा शिवसेनेचा, यात्रा कश्याला निर्णय घ्या, शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है अश्या घोषणा देण्यात आल्या.भाजपाची सावरकर यात्रा शिवाजी चौकातून पुढे निघून गेल्यानंतर दोन्ही पक्षा कडील घोषणाबाजी शांत झाली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *