ठाण्यातील मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकार वर हल्लाबोल….

ठाणे: काल ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटातील महिलांन कडून मारहाण करण्यात आली.ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंबीय भेट घेतली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

 उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाने सरकार बद्दल नपुसंक शब्द वापर आणि याची प्रचिती काळ ठाण्यात आली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Advertisements

तसेच ते पुढे म्हणाले की सरकारच नपुसंक आहे असं म्हणाल्यानंतर पुढे काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे.या ठाण्याची ओळख म्हणजे, शिवसेनेचे ठाणे, धर्मवीर दिघेंचे ठाणे अशी ओळख आहे परंतु ती ओळख पुसून गुंडांचे ठाणे असा करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. आता महिला जर गुंडगिरीची करायला लागल्या तर देशाचं राज्यच ठाण्याचं काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाण्यातील पत्रकाराला धमकी दिली जाते ठाण्यातली महिलांना मारहाण केली जाते. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई करायची होती पण त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले त्यांनी पदाचा मान राखून त्वरित राजीनामा द्यावा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *