अनिल खंडागळे-रोहा प्रतिनिधी
रोहा : सानेगाव येथे “शेतकरी कामगार पक्षाच्या” वतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे.गेली कित्येक वर्षे रायगड जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाच वर्चस्व राहिलेल आहे.लोकहिताची विविध कामे करण्यास शेतकरी कामगार पक्ष नेहमीच कटिबद्ध राहिलेला आहे.याचच फळीत म्हणूनच रायगड जिल्हा परिषदेचा गड राखण्यात शेकाप यशस्वी ठरलला आहे.लोकांच्या मनामनात आणि गावाच्या काना-कोपर्यात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय असलेले दिसतात.
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने वार बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी रायगड जिल्हातील रोहा येथील सानेगाव हायस्कूल येथे भव्य रोजगार मेळावा ” आयोजित केला असुन सर्व तरूणांनी या मेळाव्याचा फायदा घेवुन आपल्यांना रोजागार प्राप्त करुन घ्यावा अशी विनंती स्थानिक नेतेमंडळिनी केलेली आहे.या.मेळाव्यास प्रमुख उपस्थिती चित्रलेखा नृपाल पाटील यांची असणार आहे.या.मेळाव्यातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे आठवी,दहावी,बारावी,बी.ए,एम.ए,बी.काॅलेज,एम.काॅलेज,बी.एस्सी,एम.एस्सी,बी.सी.ए,एम.सी.ए,एम.बी.ए,आय.टी.आय,डिप्लोमा पदवीधर व पदव्युत्तर या सर्वांसाठी रोजगाराची संधी असणार आहे.यावेळीयुवा पत्रकार संघाच्या प्रतिनिधीशी बोलताना स्थानिक शेकापनेते नंदुशेठ म्हात्रे म्हणाले कि,”बेरोजगारीचा मुद्दा हा सबंध देशभर आणि राज्यामध्ये ज्वलंत असताना रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षसच्यावतीने अशा प्रकारचा मेळावा होणे हि सर्व पदवीधर आणि पदव्युत्तर तरूणांसाठी सुवर्णसंधी आहे.नर्सिंग,फायनान्स,मॅन्युफॅक्चरिंग,रिटेल,सेल्स मार्केटिंग,बॅकिंग,इंन्शुरंन्स,हाॅस्पिटॅलिटी,फॅसिलिटी,सेक्युरिटी,टेलिकाॅम,म व ईतर आय.टी,बीपीओ/केपीओ,फार्मा अशा विविध क्षेत्रात नोकरिची संधी उपलब्ध असुन या संधीचा फायदा रायगड जिल्ह्यातील तरूणांनी घेण्याच आवाहन यावेळी करण्यात आल.”
१२ एप्रिलला “शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने” रायगड मध्ये होणार भव्य रोजगार मेळावा…!
