सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर….!

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे खालील प्रमाणे 

Advertisements

उत्पादक गट क्रमांक १ मधून 

विजय वसंत भोसले – रुकडी 

संजय बाळगोंडा मगदूम – रुई

उत्पादक गट क्रमांक २ मधून 

शिवाजी रामा पाटील – लाटवडे

सर्जेराव बाबुराव भंडारे – नरंदे

अमल महादेवराव महाडिक- पेठ वडगाव

उत्पादक गट क्रमांक ३मधून

 विलास यशवंत जाधव – शिये

 डॉ.मारुती भाऊसो किडगावकर – निगवे दुमाला

 सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)- वडणगे

उत्पादक गट क्रमांक ४ मधून

 तानाजी कृष्णात पाटील – गडमुडशिंगी

दिलीपराव भगवान पाटील – शिरोली पुलाची

मीनाक्षी भास्कर पाटील – वाशी

 उत्पादक गट क्रमांक ५ मधून

दिलीप यशवंत उलपे – कसबा बावडा

नारायण बाळकृष्ण चव्हाण – कसबा बावडा

उत्पादक गट क्रमांक ६ मधून

  गोविंद दादू चौगले – सोन्याची शिरोली

 विश्वास सदाशिव बिडकर – धामोड

 

महिला राखीव गटातून

 कल्पना भगवानराव पाटील – टोप

वैष्णवी राजेश नाईक – कांडगाव

 इतर मागास प्रतिनिधी गटातून

संतोष बाबुराव पाटील – यवलुज

अनुसूचित जाती जमाती गटातून

 नंदकुमार बाबुराव भोपळे – चोकाक

 भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून

 सुरेश देवाप्पा तानगे – कुंभोज

 संस्था गटातून

 महादेवराव रामचंद्र महाडिक – शिरोली पुलाची

आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उमेदवारांची नावे घोषित करताच उपस्थित समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. गेली अठ्ठावीस वर्षे कारखाना ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्या हाती सोपवला, त्याच विश्वासाने यंदाही कारखान्याचे सुज्ञ सभासद आम्हाला सेवेची संधी देतील. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी राजाराम कारखाना त्यांना बळकावता येणार नाही. असे उद्गार महाडिक यांनी काढले. सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी बोलताना सर्वसमावेशक उमेदवारांचे तगडे पॅनेल आम्ही जाहीर केले असून, विजयाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले तसेच सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *