कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधारी गटाचा मोठा विजय…..!

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवत १६ जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत बाजार समितीच्या १८ पैकी १६ जागांवर सुमारे ४ हजारांहून अधिक मतांनी महाविकास आघाडी विजयी झाली आहे. विरोधी शिवशाहू परिवर्तन आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे, तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या. महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात विजय झाल्यानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.एकूण सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. बाजार समिती निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्थेचे १४ हजार १३३ ग्रामपंचायतीतील ५ हजार ७३३,अडते व्यापारी गटाचे मतदान १२१७, माथाडी तोलाई गटाचे ८९४ मतदान आहे. यापैकी एकूण २० हजार २८० मतदान झाले होते.

Advertisements

 चर्चेतील विषय चर्चेतच राहिला……

राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकित महाडिक गटाने बाजी मारली त्यानंतर सर्वत्र अशी चर्चा सुरू होती की राजारामचा निकला सगळीकडे फरक पडणार परंतु तसे काहीच झाले नाही. आमदार सतेज पाटील यांनी कमबॅक करत बाजार समितीवर मविआ झेंडा फडकवला.येणाऱ्या आगामी निवडणुकीत कोल्हापूरकरांना खूप काही पाहायला मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *