लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त ६ मे पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन….

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:5 Minute, 10 Second

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त दिनांक ६ ते १४ मे २०२३ या कालावधीत शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त आयोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे….

दिनांक ६ मे रोजी शाहू समाधी स्थळ येथे सकाळी ९.३० वाजता शाहू समाधी स्थळ मानवंदना, १०.०० वाजता राजर्षी शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देण्यात येणार आहे. शाहू मिल येथे १०.३० वाजता स्मृती शताब्दी सांगता कार्यक्रम व कृतज्ञता पर्व २०२३ उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता चित्रपट “छत्रपती शिवाजी” १९५२ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता लोककला व स्थानिक पारंपारिक कलाकार हा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक ७ मे रोजी शाहू मिल येथे सकाळी ९.३० वाजता शाहू महाराज यांना कोल्हापुरातील मान्यवर चित्र शिल्पकारांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता चित्रपट “माणूस” १३३९ दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता चित्रपट “भूपाळी ते भैरवी” महाराष्ट्राचा लोकजागर हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे…

दिनांक ८ मे रोजी शाहू मिल येथे सकाळी १०.३० वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य राजेंद्र हंक्कारे यांची कॅलिग्रॅफी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता “ध्यासपर्व” २००१ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता राजर्षी शाहू महाराजांना शाहीरी मुजरा (शाहिरी पोवाडा) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक ९ मे रोजी शाहू मिल येथे सकाळी १०.३० वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री. मंदार वैद्य यांचे पेपरक्राफ्ट कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता “गांधी” १९८२ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता वारसा समृध्द कलेचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १० मे रोजी शाहू मिल येथे सकाळी १०.३० वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी सत्यजित निगवेकर यांची माती शिल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता “महात्मा फुले” १९५४ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हा कार्यक्रम

तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणारे, कोल्हापूरचा औद्योगिक, शिक्षण, आरोग्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांचा विकास दर्शविणारे व विविध शासकीय योजना संबधी माहिती देणारी दालने असणार आहेत. सदरची दालने ही दिनांक ६ ते १४ मे, २०२३ अखेर सकाळी १०.०० ते रात्री १०.०० पर्यंत सर्व नागरिकांसाठी खुली राहणार आहेत.

सर्व ठिकाणी प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच येते थाटण्यात आलेल्या विविध स्टॉलना भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *