अंतिम सामन्यात कोल्हापूर पोलीस अ संघाने देवगिरी फायटर्स क्लब वडगाव अ संघाचा ८-६ गोलनी पराभव करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

Reporter : Javed devdi

कोल्हापूर दिनांक २७ – लाईन बाजार येथील नव्याने बांधण्यात आलेल्या अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानावर लाईन बाजार मधील मा.बेस्ट हॉकीपटू कै.आनंदराव उर्फ बाळासाहेब माने यांचे स्मरणार्थ लाईन बाजार हॉकी प्रेमी व माने परिवार यांचे तर्फे शुक्रवार दिनांक २५ ते रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ अखेर आनंद चषक हॉकी स्पर्धेचे (डे – नाईट) आयोजन करण्यात आले होते. या हॉकी स्पर्धेत एकूण २० संघाने सहभाग घेतला होता. त्यापैकी अंतिम सामन्यात कोल्हापूर पोलीस अ संघाने देवगिरी फायटर्स क्लब वडगाव अ संघाचा ८-६ गोलनी पराभव करत या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

Advertisements

विजेत्या व उपविजेत्या संघास शांतादेवी डी.पाटील, रमेश सरनाईक, स्वाती यवलुजे, माधुरी लाड, सचिन पाटील, धीरज जाधव यांच्याहस्ते रोख रुपये व चषक प्रधान करण्यात आले. यावेळी श्रीकांत चव्हाण, आप्पासाहेब पालखे मा.हॉकी खेळाडू सर्जेराव माने, नंदू माने, मोहन घाटगे, विलास पाटील, विशाल माने, रोहन माने, सिद्धेश मगदूम, ओमकार अकोळकर, सुरजित माने उपस्थित होते.

तत्पूर्वी आजच्या झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात देवगिरी फायटर्स क्लब वडगाव अ संघाने हनुमान ब्लेसिंग संघाचा ८-५ गोलने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

यावेळी लाईन बझार मधील नावाजलेला राष्ट्रीय हॉकी खेळाडू दयाजी पाटील याचे निधन झालेबद्दल लाईन बझार मधील हॉकी खेळाडूंच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर पोलीस अ संघाने महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा ८-४ गोलने पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू

उत्कृष्ट गोलकीपर

ऋषिकेश थोरात

(कोल्हापूर पोलीस अ)

मॅन ऑफ द सिरीज

पृथ्वीराज साळुंखे

(कोल्हापूर पोलीस अ)

मॅन ऑफ द मॅच

सत्यजित सावंत

(कोल्हापूर पोलीस अ)

उत्कृष्ट फॉरवर्ड

 ताहीर शेख

(हनुमान ब्लेसिंग)

अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पद्मराज शिंदे

(देवगिरी फायटर्स अ)

उत्कृष्ट बचावपट्टू

इरफान सय्यद

(हनुमान ब्लेसिंग)

यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेत पंच दीपक पाटील, राहुल गावडे, दीपक मालाई, अनिकेत मोरे, संदीप सावंत यांनी काम पाहिले. 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक पाटील, सुहेल शेख, माज सय्यद, अभिजित पाटील, अनिकेत जाधव, अभिजीत गवळी व माने परिवार यांनी अधिक परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *