युवा पत्रकार संघाचे 14 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2023 नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे पार पडली…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:7 Minute, 11 Second

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क

कोल्हापूर दि.1, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा घेतला जातो. यावर्षी देखिल 14 व्या वर्धापन दिनानिमित्त समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा, युवा वर्गाचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

यानिमित्त कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी बोलताना संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी सांगितले की

9/9/2023 रोजी 14 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी संघाच्या प्रमूख पदाधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करावे. अतिशय भव्य असा हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा करावा अशा सूचना देखील त्यांनी यावेळी बोलतांना दिल्या.

विशेषतः उद्योगपती मा. अमर शिंगाडे यांनी युवा पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी इंटिरियर संदर्भात आर्थिक मदत करणार आहेत याची जाणीव ठेवून त्यांचाही कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरी पुरस्कार देऊन गौरव करण्यातत येणार आहे.

 गोवा, कर्नाटक राज्याचे अध्यक्ष रतन हुलस्वार यांनी दिवसागणित पत्रकार संघाचे विस्तार होत असून सर्व पदाधिकारी सभासदांची जबाबदारी वाढत आहे सभासद पत्रकारांना संघाच्या वतीने आवश्यक असणाऱ्या सर्वतोपरी मदत करणार असून कोल्हापूरात भव्य सर्व सोयीनियुक्त असे कार्यालय करणार असून याचा लाभ सर्वसामान्य पत्रकारांना होणार आहे. 

  कायदे विधिज्ञ ॲड.संदिप पवार आजच्या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पत्रकार हा सर्व समाजाचा आरसा असून निर्भीड आणि निपक्ष असे काम केले पाहिजे दिल्ली पत्रकार अभ्यास दौऱ्यामुळे सर्वसामान्याचा अपेक्षा आपल्या कडून वाढल्या आहेत त्यामुळे आपले कार्य योग्य दिशेने सुरू असून पत्रकारिता करत असताना काही समस्या उद्भवल्यास अडचण आल्यास कायदे विषयी मी मदत करण्यास तयार आहे कधीही हाक मारा असे त्यांनी सांगितले. 

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची मते देखिल जाणुन घेतली. 

यावेळी बोलतांना संघाचे कार्याध्यक्ष ऑनलाइन माध्यम तज्ञ विवेक पोर्लेकर यांनी प्रथमदर्शी कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना सांगितली तसेच पुरस्कार सोहळा कशा पध्दतीने आयोजीत करावा कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना कोणते पुरस्कार असतील, वर्धापन दिनानिमित्त कोणते कोणते कार्यक्रम घेतले जातील त्याचे थोडक्यात स्वरूप सांगितले.

राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी यांनी चांद्रयान तीन भारताचे यशस्वीरित्या कार्य सुरू असून राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एका शास्त्रज्ञाचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावे हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यांनी चांगला होणार असून मी याला पूर्ण वेळ देणार आहे असे सूचना केली.

 यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये करवीर तालुका अध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला यांनी दैनिक पुढारी ऑनलाईनचे विशाल पुजारी यांची करवीर तालुका उपाध्यक्ष पदी निवड केली, तर करवीर तालुका सचिव पदी दैनिक प्रीतीसंगमचे प्रतिनिधी अपर्णा पाटील यांची निवड करण्यात आली. युवा पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 

तसेच या बैठकित विशेष करून युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष व निर्भीड पोलिस टाईम चे संपादक सुशांत पोवार यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य प्रदेश प्रसिद्धी प्रमूख पदी निवड झाल्या बद्दल तसेच सिमंतिनी मयेकर. यांची सिंधदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल युवा पत्रकार संघाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला.

 राज्य सरचिटणीस अजय शिंगे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्व पदाधिकारी आणि सभासद यांना सूचना देण्यात आली.

 यावेळी विभागीय अध्यक्ष कौतुक नागवेकर, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वाळवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रत्नदीप चव्हाण, सांगली जिल्हाध्यक्ष प्रवीण मिरजकर , बावडा मिसळ च्या संचालिका सौ पुजा रत्नदिप चव्हाण, मीडिया समन्वयक पत्रकार अन्सार मुल्ला, दैनिक बंधुताचे शहर अध्यक्ष रवी कांबळे, हातकलंगणे तालुकाध्यक्ष शकील जमादार, जितू कळंत्रे, शिवाजी धनवंत, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य पदाधिकारी तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी , सभासद उपस्थित होते.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *