खासदार धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी तीन लाखाची बक्षीसाचा नेताजी पालकर ग्रुप मानकरी ठरला..

कोल्हापूर : प्रचंड उत्साहाच्या वातावरणात खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीची तीन लाख रुपयांच्या बक्षिसाची दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायाम शाळा या संघाने फोडली. आणि 2023 च्या युवाशक्ती दहीहंडीच्या स्पर्धेचे एक नंबरचा बक्षीस  विजेता प्रकाश मोरे ठरला.

यंदाही दहीहंडीच्या निमित्ताने ऐतिहासिक दसरा चौक येथील मैदानावर महाडिक प्रेमींचा उत्साह पाहावयास मिळाला. 

Advertisements

सुरुवातीलाच मैदानावर खासदार धनंजय महाडिक यांची आगमन होताच ढोल ताशाचे नृत्य कृष्णराज महाडिक यांच्या सहभागणे सुरू होता, खासदार धनंजय महाडिक यानी पाहताच ढोल वाजवायचा त्यांना मोह मात्र आवरला नाही त्यांनीही ढोलवर काही टोला लगावला त्यानंतर त्यांनी स्टेजवर प्रस्थान केले. 

माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.  

खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून प्रस्ताविकवर भाषन केले, प्रास्ताविक मध्ये

  “रस्सी जल गये पर बल नही गया” असा विरोधकांना टोला लगावताच मैदानावर एकच आवाज घुमला  धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी यंदा आकर्षण ठरली. 

पाच वाजता पावसाचे सावट होते मात्र सायंकाळी साडेसहा वाजता मैदान गर्दीने फुलले यावर्षी 15 गोविंदा पथकाने रजिस्ट्रेशन केले होते.

तीन लाखाची दहीहंडी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष शिगेला पोहचला होता. ट्रिपल एकाद्वारे मानवी मनोराने चढाई करत अखेर तीन लाख बक्षीसाची नेताजी पालकर ग्रुप (गडहिंग्लजने) दहीहंडी फोडताच मैदानावर जमलेल्या हजारो तरुणांनी एकच फिल्मी गाण्यावर जल्लोष केला.

खासदार धनंजय महाडिक यांनी मै हू डॉन या गाण्यावर ठेका धरला‌. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते विजेत्यांना तीन लाखाची बक्षीस व स्पर्धेमध्ये सहा थर असणाऱ्या गोविंदा पथकाना बक्षीस देण्यात आली.  यावेळी संयोजकांनी चांगले नियोजन केले होते वेळेचे भान ठेवून सूत्रसंचालन, सुरक्षितता अमाप गर्दीतही काटेकोर नियोजन केले होते.

नियोजन मध्ये इंद्रजीत बापू जाधव, दत्ता आवळे, चेतन माने, संजय निकम, अभिषेक कोल्हापुरे, बी न्यूज चे ताज मुल्लाणी, छोटू लोहार, यानी परिश्रम घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *