परीख पूल व खालील रस्ता चांगला करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते 12 तास अन्नत्याग आंदोलन – आप ने घेतली दखल.. 

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

 कोल्हापूर प्रतिनिधी, परीख पूल व खालील रस्ता चांगला करावा या साठी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते 12 तास अन्नत्याग आंदोलन – आपने घेतली दखल 

Advertisements

कोल्हापूर मुख्य शहरामध्ये सीबीएस स्टँड लगत रेल्वे स्टेशन आणि रेल्वे पटरीच्या खालून परीखपुल म्हणजे स्टॅन्ड आणि राजारामपुरी परिसरास जवळचा वाहतूकीसाठी रस्ता म्हणजेच परीखपु नेहमी पुला खालून नागरीकांना ये जाा करावा लागतो.

अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न म्हणजेच परीख पुलाची नूतनीकरण दुरुस्त करणे कोल्हापूर महानगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रश्न सुटू शकतो पण ह्याची जबाबदारी कोणीच घेण्यास पुढे येईना 

 गेल्याच महिन्यात 43 कोटी कोल्हापूर रेल्वे साठी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली कामाच्या समारंभाची मोठ्या दिमाखात थाटामाटा रेल्वेप्रशासना तर्फे स्टेशनवर कार्यक्रमही घेण्यात आले, पण परीख पुलाची काही प्रश्न सुटेना

कोल्हापुरात अनेक सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यापैकीच एक म्हणजे सामाजिक जाण असलेले फिरोज शेख व त्यांचे कार्यकर्ते यांनी परी पुलाखाली बारा तास अन्न त्याग करून आंदोलन छेडले व रेल्वे प्रशासन महापालिकेला 

लक्ष वेधण्यासाठी पुला खालून ये जा करणाऱ्या नागरीकांच्या कडून सह्यांची मोहीम राबवली आंदोलन स्थळी भेट देऊन तब्बल वहीवर 1235 नागरिकांनी सही करुन आपला अभिप्राय वहीत लिहिले.

या आंदोलनांचे दखल घेऊन सायंकाळी आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन फिरोज शेख व आंदोलन कर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यास विनंती करून आप आपल्या सोबत असून आपल्या आंदोलनाची माहिती दिल्ली पर्यंत पोहोचवू

लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा या साठी स्वतः आम्ही यात सहभाग होऊन प्रयत्न करू. दिल्ली मध्ये आप सरकार विकासाभिमुख योजना राबवत असून दिल्लीतील शहराचा कायापालट केला आहे.

त्याच धर्तीवर कोल्हापुरातही विकास होण्यासाठी आमच्याकडूनही जनजागृती सुरू असून लवकरच सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी ग्वाही  त्यांनी  दिली. त्याच बरोबर फिरोज शेख त्यांचे कार्यकर्ते उपोषण सोडले. यावेळी आपचे शहर सचिव अभिजीत कांबळे संजय नलावडे अंकुश ढवाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *