उद्याचा पुकारलेला आंदोलन स्थगित हा झाला निर्णय, सकल मराठा समाज – कोल्हापूर…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर, प्रतिनिधी: सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर सकल मराठा समाज यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चा व आश्वासनाने…. माननीय पालकमंत्री दीपक केसरकर व माननीय मंत्री महोदय यांनी 19 सप्टेंबर 2023 म्हणजे गणेश जयंतीपूर्वी मुंबई येथे मंत्रालयामध्ये सकल मराठा समाज आरक्षणाबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे सर्वानुमती घेतलेल्या निर्णयानुसार… दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी पुकारलेले आंदोलन स्थगित करत आहोत.
याबाबत सरकारकडून दिलेला शब्द जर नाही पाळला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी….
सकल मराठा समाजाच्या बैठकीस वसंतराव मुळीक, आर के पवार , बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, अनिल घाडगे, धनंजय सावंत, शाहीर दिलीप सावंत, सुशील भांदिगिरे, मयूर पाटील, काका पाटील, काका जाधव, अमर निंबाळकर इत्यादी उपस्थित होते…

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *