सुबोध भावे दिग्दर्शित करतोय भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान”  

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 31 Second

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क

सुपरहिट संगीतमय चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर पुन्हा एकदा अभिनेता – दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट “मानापमान” द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाले आहेत. एफटीआयआय पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.  

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘मी वसंतराव’, ‘गोदावरी’ आणि ‘बाईपण भारी देवा’चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित “संगीत मानापमान” या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित एक नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत. 

कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. आणि त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. 

‘मानापमान’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याच्या वेळी आपलं मनोगत एका व्हिडिओ द्वारे शेअर करतं सुबोध भावे म्हणाले की, माझ्या अत्यंत आवडत्या जागी जिथे मला प्रचंड ऊर्जा मिळते, जिथे येऊन आयुष्यात चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते ती जागा म्हणजेच एफटीआयआय पुणे येथे कट्यार काळजात घुसली, आणि डॅा. काशिनाथ घाणेकर आणि माझ्या एका वेबसिरिजचा मुहुर्त ही इथेच ह्या झाडाखाली पार पडला होता. आणि आज माझा आगामी चित्रपट “मानापमान” चा मुहुर्त देखील इथेच होतो आहे.

कट्यार काळजात घुसली, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटांची संपूर्ण तंत्रज्ञानांची टीम ह्या चित्रपटात ही असणार आहे. तसेच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत असणार आहे, शिरीष गोपाळ देशपांडे यांनी पटकथा आणि संवाद लिहिलेत तर प्राजक्त देशमुख यांचे अतिरिक्त पटकथा आणि संवाद असणार आहेत. आम्ही सगळे पूर्ण प्रयत्न करू की उत्तम दर्जेदार चित्रपट तुमच्या समोर घेऊन येऊ. जिओ स्टुडिओज्, ज्योती देशपांडे निर्मित, आमच्या ह्या चित्रपटावर मायबाप प्रेक्षकांचा आशिर्वाद असाच राहू दे. गणपती बाप्पा मोरया ! 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत “मानापमान” चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होत असून भारतातील वेगवेगळ्या नेत्रदीपक ठिकाणी ते केलं जाणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *