महाडिक परिवाराची दातृत्वाची परंपरा कायम

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 16 Second

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : कोणत्याही आपत्तीच्यावेळी पदरमोड करून जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक परिवाराची परंपरा आहे. २००५ चा महापूर असो, २०१९ चा प्रलय असो किंवा सध्याची कोरोना विरूध्दची लढाई, महाडिक परिवारानं सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत, हजारो कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.
गेले १५ दिवस माजी खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह संपुर्ण महाडिक परिवाराच्या वतीने अनेक कुटुंबियांना, जीवनावश्यक अन्नधान्य आणि परराज्यातून आलेल्या कामगारांना भोजन दिले जाते. त्यासाठी संपुर्ण महाडिक परिवार स्वतः राबत आहे. परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून आलेले कामगार किंवा मजूर सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बिकट अवस्थेत आहेत. त्यांच्यासाठी महाडिक परिवाराच्यावतीने दोन वेळचे जेवण पुरवले गेले. सुमारे २२०० जणांना दररोज जेवण देण्याचा उपक्रम सुमारे १५ दिवस राबवला. तर सुमारे २५०० कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
त्यामध्ये कांदे, बटाटे, खाद्यतेल, आटा, तांदूळ, डाळी, कडधान्य, काडीपेटी, उदबत्ती, मीठ अशा वस्तूंचा समावेश होता. जिल्हयातील गरजू नागरिकांना वेळेवर तयार भोजन आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्याने अनेकांनी महाडिक परिवाराचे आभार मानले. विशेष म्हणजे महाडिक कुटुंबातील सर्व सदस्य जेवण बनवण्यासाठी आणि किट तयार करण्यासाठी मेहनत घेत होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *