कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. परंतु अद्यापही भयावह परिस्थितीत आपल्या भारत देशात याचा प्रादुर्भाव रोखण्यात चांगले यश मिळत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र व राज्य सरकारने घेतलेली ठोस पावले व त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सामान्य नागरीकांनी दिलेली साथ होय.
कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात असून देखील जिल्ह्याचा आरोग्यदायी दवाखाना असणारा छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सी.पी.आर) पूर्णतः कोरोना रूग्णांसाठीचा दवाखाना म्हणून घोषित केला आहे. या दवाखान्यात रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस, बद्रर्स व इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य मात्र परमेश्वराच्या हवाली जिल्हा प्रशासनाने दिले आहे का ? असे खेदाने म्हणावे वाटते. कारण विविध वृत्तपत्रातील वृतांकन वाचताना सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे कि नेमके जिल्हा प्रशासन या लोकांच्या बाबतीत एवढा ढिसाळपणा का बाळगत आहे ? कोरोना संशयीतांच्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सर्वांना N-95 मास्क, पी.पी.ई कीट वापरणे बंधनकारक असताना त्यांच्याकडे अशा कोणत्याही सुविधा नाहीत. वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपलब्धतेनुसार N-95 मास्क व पी.पी.ई कीट दिले जातील असा बेजबादार खुलासा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी केला आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता हे आरोग्य दूत रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी जिल्हा प्रशासन घेताना दिसत नाही. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या शिष्टमंडळाच्यावतीने इमेल द्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वरील बाबींचा गांभीर्याने प्रशासनाने विचार करून तातडीने ठोस पावले उचलणे व संबंधित आरोग्य यंत्रणेचे आरोग्य सुरक्षित ठेवावे असे सूचित करण्यात आले. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांचे आरोग्य सांभाळनाऱ्या सी.पी.आर मधील दोन डॉक्टर, १० नर्सेस व चार कर्मचारी कॉरंटाईन होईपर्यंत त्यांच्याकडे आरोग्य विभागाने दूर्लक्ष करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने त्वरित आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्रशासनाकडून उपलब्ध करून घ्याव्यात. तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व स्टाफची काळजी घ्यावी.
असे पत्रक जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा चिटणीस मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, संतोष भिवटे, राजू मोरे, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, विजय आगरवाल यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आता तरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाकडे लक्ष द्यावे

Read Time:4 Minute, 8 Second