मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स,परिचारिका, आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणाचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज घोरपडे यांनी इचलकरंजीजवळील कोरोची येथे उत्पादन सुरु केले आहे. यासाठी वापरण्यात येणारे ५ पदरी मेल्टब्लोन स्पन हे ६० जीएसएम नॉन ओव्हन कापड डीआरडीओ आणि मुंबई येथील प्रयोगशाळेने प्रमाणित केले आहे.
घोरपडे यांची युवा क्लोथींग कंपनी श्रीपाद गारमेंट कोरोची येथे आहे. याठिकाणी पीपीई कीट साठी उत्तम दर्जाच्या शर्टची निर्मिती करत आहेत.
कोव्हिड -१९ या विषाणूने जगाबरोबरच आपल्या देशात शिरकाव केला आहे. राज्यामध्ये याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्र मोठी जोखीम घेवून अशा रुग्णांवर उपचार करत आहे. आपल्या जिल्ह्यामध्येही कोव्हिड -१९ संशयित आणि बाधित रुग्णांवर डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक आणि सहायक कर्मचारी मोठ्या धाडसाने आणि कर्तव्यनिष्ठेतून उपचार करत आहेत.असे प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर यांनी प्रसिद्धीस दिले.
कोरोचित तयार होतंय डॉक्टरांचे सुरक्षा कवच पीपीई किट
