हॉटेल सातबारा वर केली कारवाई : सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  :  उचगाव – गडमुडशिंगी रस्त्यावर उचगाव हद्दीत असणाऱ्या सातबारा हॉटेलमध्ये गांधीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त केला. बिअरचे बॉक्स व पाचशे रुपये रोख असा एकूण ४६०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून हॉटेल मालक व चार कर्मचारी अशा पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
हॉटेल मालक राहूल शंकर सावंत (वय ३४, रा. मणेरमळा उचगांव ), सतिश शहाजी इंगळे (वय ३०, रा. सांगवडेवाडी), ओंकार राजू जाधव (वय १९, रा.बोरपाडळे ता.पन्हाळा), विकास प्रभाकर डांगे( वय १९, रा.लवंगे ता. मंगळवेढा, सोलापूर ), कुमार रामकृष्ण बनसोडे (वय २९, रा.कचरेवाडी, ता.मंगळवेढा, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातबारा हॉटेलमध्ये अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. हॉटेलच्या किचनचे पाठीमागील खोलीत हे बिअर बॉक्स पोलिसांना मिळाले. लॉकडाऊन काळात मद्यविक्रीवर बंदी असताना दारूचा अवैधसाठा सापडला. ट्युबर्ग, बेक आईस बिअर, बडवायझर बिअर, किंगफिशर तसेच लंडन प्लिसनर बिअर व रोख पाचशे रुपये असा एकूण ४६०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस नाईक शशिकांत रामहरी जाधवर यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, मुरलीधर लांगी यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस नाईक बालाजी हांगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *