खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेल्या कोरोना पोझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने २१ जणांना केले क्वारंटाईन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 43 Second

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  :  खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या कडेगांव जिल्हा सांगली येथील संबंधित २१ जणांना कडेगांव येथे
इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली

सांगली जिल्ह्यातील खेराडे वांगी, तालुका कडेगाव येथील एक व्यक्ती मुंबई येथे रिक्षा ड्रायव्हरचे काम करत होती.
या व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला. त्यांच्या पार्थिवावर खेराडे वांगी येथे दिनांक १९ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मुंबई महापालिकेतर्फे दिनांक २२ एप्रिल रोजी आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने गतिमान हालचाली करून या व्यक्तीशी संबंधित २१ जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रात्री ठेवले आहे. या सर्वांचे स्वाब घेण्यासाठी आरोग्य पथक कडेगावला सकाळी रवाना झाले आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ .अभिजित चौधरी यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *