कोल्हापूरात कोव्हीड-१९ तपासणी लॅब सुरू : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  :  जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज लॅब कार्यान्वित करण्यात आली. या प्रयोगशाळेत तपासणी होणाऱ्या स्वॅबचे सर्व अहवाल निगेटिव्ह यावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागात ही कोव्हिड-१९ तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी लॅबची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लॅब सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तत्परतेने जिल्ह्यातील लॅबबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आयसीएमआरने आज मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्वॅबची तपासणी आता या प्रयोगशाळेत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून या लॅबसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या लॅबसाठी लागणारे कॅट्रीजेस जास्तीत जास्त कशा मिळतील त्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.  ४५ मिनिटांत तब्बल १६ टेस्ट होणार आहेत, असे सांगून पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यासह राज्य शासनाचे त्यांनी मनापासून धन्यवाद मानले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *