Share Now
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेत एका १९ वर्षीय युवतीवर दोन वासनांध नराधमांनी लैंगिक अत्याचार केला.
पिडीत युवती आपल्या मैत्रिणीकडे गेली होती.त्या युवतीवर ओळखीच्या दोन युवकांनी गाडीवर बसवून नेवुन रेल्वे काॅलनीत दारू पाजुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीसांकडुन अक्षय कलशेट्टी व राजु अच्युदन या आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३७६,३७६ ड तसेच अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने २९ एप्रिल २०२० पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने सर्वसामान्य लोकांना अत्यावश्यक वस्तु मिळवणे त्रासदायक ठरत असताना आरोपींना दारु कुठुन मिळाली हा चर्चेचा विषय झाला आहे. आरोपींना दारु पुरवण्याऱ्यांवर कारवाई केली जाणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share Now