Share Now
Read Time:1 Minute, 19 Second
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोल्हापूर येथील लोणार वसाहत याठिकाणी १५ रोजंदारी कामगार कुटुंब व शेंडा पार्क जवळील बांधकाम कामगार १० कुटुंब यांना महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन मार्फत मदतीचा हात देण्यात आला.
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही व ज्यांना कोणतीही मदत मिळाली नाही अशा गरजू कुटुंबांना महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन मार्फत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याकरता लोणार समाजातील स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया चे भागवत झाडगे यांच्याबरोबर संदीप टोणे व अमर नरळे यांनीही पुढाकार घेऊन ही मदत लोणार समाजातील गरजुंपर्यंत पोहचवली.
यावेळी विजय धनवडे, विवेक गोडसे, प्रशांत सावंत, संज्योत जयस्वाल, एस एफ आय चे सेक्रेटरी नवनाथ मोरे हे उपस्थित होते.
Share Now